युतीवरून राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल ट्विटरवर भिडले

rahul-gandhi-kejriwal

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गेली अनेक दिवस काँग्रेस आणि आपमध्ये युतीवरून चर्चा सुरू आहे. परंतु त्याचा काही निकाल लागताना दिसत नाही. आता दोन्ही पक्षांचे अध्यक्ष ट्विटरवर भिडताना दिसत आहेत. अरविंद केजरीवाल यांनी यु टर्न घेतला अशी टीका राहुल गांधींनी ट्विटरवरून केली तर त्यावर कुठला यु टर्न अशा प्रश्न केजरीवाल यांनी विचारला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटले की, “दिल्लीत काँग्रेस आणि आपची युती म्हणजे भाजपचा पराभ निश्चित. यासाठी काँग्रेस आपला दिल्लीत ४ जागा द्यायला तया आहे. परंतु केजरीवाल यांनी दुसरा युटर्न घेतला आहे. युतीसाठी आजही आमचे दरवाजे खुले आहेत. परंतु वेळ निघून जात आहे.”

केजरीवाल यांनी कुठला युटर्न असा प्रश्न विचारला आहे. तसेच “आताच आपली चर्चा सुरू होती तुम्हाला युती करण्याची इच्छा दिसत नाही. तुम्ही व्यर्थ बडबड करत आहात. आज देशाला मोदी-शहांपासून वाचवले पाहिजे. तुम्ही उत्तर प्रदेश आणि इतर राज्यात मोदी विरोधी व्होट बँक करून मोदींनाच मदत करत आहात.” हे दुर्दैव असल्याचेही केजरीवाल यांनी म्हटले.