मोदी कुठल्या प्रकारचे हिंदू आहेत?; राहुलचा सवाल

1
rahul-gandhi

सामना ऑनलाईन । उदयपूर

आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतःला ‘हिंदू’ म्हणवतात. पण हिंदुत्वाचा मूळ पाया कोणता, हेच त्यांना ठाऊक नाही, असे सांगतानाच मोदी हे कुठल्या प्रकारचे हिंदू आहेत, असा सवाल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. सुमारे 400 डॉक्टर्स, इंजिनीयर्स, वकिलांचा सहभाग असलेल्या एका संवादाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

नोटाबंदी असो की गब्बरसिंह टॅक्स (जीएसटी). त्यामागे छोटय़ा उद्योगांचा गळा घोटून बडय़ा कंपन्यांना मार्ग खुला करून देण्याचे मोदी सरकारचे मोठे षड्यंत्र होते. त्यातून देशातील 15 बडय़ा उद्योगपतींना संधी मिळवून देण्यात आलीय, असा स्पष्ट आरोप राहुल गांधी यांनी केला.

सर्जिकल स्ट्राइकला राजकीय मुद्दा बनवला

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत आपला पराभव होणार, हे भाजपला कळून चुकले होते. त्यामुळे त्यांनी ‘सर्जिकल स्ट्राइक’ला राजकीय मुद्दा बनवला. आपल्या राजकीय फायद्यासाठी लष्कराचाही वापर करून घेतला, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

एक प्रतिक्रिया