राफेल करारात घोटाळा झाला; भूमिकेवर राहुल गांधी ठाम

61
rahul-gandhi

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राफेल करारात घोटाळा झाला आहे, या आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाचा उल्लेख करत राहुल यांनी आपण भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. या करारात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. या प्रकरणाची केंद्रीय दक्षता आयोगाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसकडून सुरुवातीपासूनच करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. या प्रकरणात गैरव्यवहार झाला नसल्याचा सरकारचा दावा फसवा असल्याचेही ते म्हणाले.

काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष? राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही राहुल गांधी यांनी राफेल करारातील घोटाळ्याचा मुद्दा उचलून धरला होता. या प्रश्नावर त्यांनी भाजपवर कडाडून हल्ला चढवला होता. भाजपवर टीका करताना सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख केल्याने त्यांना न्यायालयात माफीही मागावी लागली होती. मात्र, अजूनही आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या