राहुल गांधींची शरद पवारांना क्लिन चीट, पाहा काय म्हणाले


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राफेल कराराच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींचे समर्थन केल्याच्या बातम्या आल्या होत्या. ज्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी शरद पवार यांची बाजू घेतली. पवार साहेबांनी मोदींना पाठिंबा दर्शवला नव्हता, आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं, असं म्हणत राहुल यांनी पवारांची बाजू पत्रकारांसमोर मांडली.

तसेच इथे तो मुद्दा महत्वाचा नसून पंतप्रधान मोदी ज्या भ्रष्टाचाराचे आरोप करत सत्तेवर आले त्यांच्यावरच आज भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. ते गप्प आहेत, त्यांना जर यावर बोलता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

गुरुवारी राफेल घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा मोदींवर आरोपांच्या फैरी झाडल्या. संरक्षणमंत्र्यांवर देखील राहुल गांधी यांनी टीका केली.