भाषणबाजी खूप झाली, आता खुर्च्या सोडा!

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली

देशातील तरुणांना  रोजगार देऊ शकत नसाल आणि वाढती महागाई नियंत्रणात आणू शकत नसाल तर सत्ता सोडा, अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर तोफ डागली आहे. वाढती महागाई आणि बेरोजगारीच्या समस्येवरून राहुल गांधी यांनी भाजपला घेरायला सुरुवात केली आहे.

एलपीजीच्या वाढत्या किमतीबाबत एका वृत्तपत्रातील लेख लिंक करत ‘महंगी गॅस, महंगी राशन, बंद करो खोकला भाषण, दाम बांधो, काम दो, वर्ना खाली करो सिंहासन’ असे ट्विट करत राहुल यांनी भाजपवर टीका केली आहे.

घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमतीत ४.५० रुपयांनी वाढ झाली आहे. जुलै २०१६ मध्ये सरकारने सबसिडी बंद करण्यासाठी प्रत्येक महिन्यात दर वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आतापर्यंत १९ वेळा किमतीत वाढ करण्यात आली आहे.