कसाऱ्याजवळ रूळ तुटला, एक्स्प्रेसचा मोठा अपघात टळला, वाहतूक ठप्प

सामना ऑनलाईन । मुंबई

मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील आटगाव स्थानकाजवळ डाऊन मार्गावर रेल्वे रूळ तुटला होता. ही बाब लक्षात आल्याने भागलपूर एक्स्प्रेस तातडीने थांबवण्यात आली. यामुळे मोठा अपघात टळला. दरम्यान, रूळ तुटल्यामुळे मुंबईकडून येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.