मुंबईत पुन्हा पावसाची जोरदार हजेरी

सामना ऑनलाईन । मुंबई

नवरात्री नंतर दिवाळीच्या तयारीला लागलेल्या मुंबईकरांना आज संध्याकाळी अचानक पावसाने गाठले. दक्षिण मुंबईत तसेच मध्य मुंबईच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या या पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली.

  • संध्याकाळी ४.३० वाजता एकदम अंधार पसरला, १५-२० मिनिटे जोरदार पाऊस झाला
  • मुंबईच्या उपनगरांमध्येही पावसाची हजेरी
  • नवी मुंबईच्या काही भागांमध्ये पाऊस
  • अचानक आलेल्या पावसामुळे ऑक्टोबर हीटचा त्रास कमी झाला
  • ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट
  • पावसामुळे सुखद गारवा
  • घाबरू नका, प्रशासनाचे आवाहन
  • रेल्वे स्टेशनवर घाईगडबड करू नका, एकाच ठिकाणी गर्दी करू नका असे आवाहन करण्यास सुरुवात झाली आहे
  • परिस्थिती नियंत्रणात
  • आगामी २४ तासांत मुंबईत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, कुलाबा वेधशाळेचा अंदाज