कोकणात पावसाची रिमझिम

सामना प्रतिनिधी । मालवण

मालवणसह देवगड, वेंगुर्ला किनारपट्टी भागात बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडला. वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे आंबा व काजू बागायतदार चिंतेत पडला आहे.

दरम्यान, अरबी समुद्रात कर्नाटक पासून ४०० किलोमीटर अंतरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. मात्र येत्या दोन दिवसात परिस्थिती पूर्वपदावर येईल, अशी माहिती सेवानिवृत्त हवामान विभाग तज्ञ दिनेश मिश्रा यांनी दिली आहे.