एकही धाव न देता टिपले १० बळी

सामना ऑनलाईन । जयपूर

राजस्थानच्या १५ वर्षीय आकाश चौधरी या युवा खेळाडूने स्थानिक ट्वेण्टी-२० सामन्यात नवा इतिहास रचला. त्याने एकही न धाव देता १० बळी गारद करण्याची करामत करून दाखवली.

पर्ल ऍकॅडमीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. दिशा क्रिकेट ऍकॅडमीने २० षटकांमध्ये १५६ धावा तडकावल्या. मात्र धावांचा पाठलाग करणाऱ्या पर्ल ऍकॅडमीचा डाव ३६ धावांमध्ये गडगडला. आकाश चौधरीने पहिल्या तीन षटकांत प्रत्येकी २ गडी आणि अखेरच्या षटकात हॅटट्रिकसह ४ फलंदाज बाद केले.