मतदान कार्डावरचे चेहरे जुळेना, २५ हजार डुप्लिकेट नावे उडवणार

11
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । जयपूर

राजस्थान विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधी मतदार याद्यांची तपासणी सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत २५ हजार मतदान कार्ड ही बोगस असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या कार्डांवरचे चेहरे याद्यांशी जुळत नसल्याने बोगस मतदारांची नावे पकडण्यात निवडणूक आयोग अधिकाऱ्यांना यश आले आहे.

निवडणूक आयोगातील कर्मचारी एका सॉफ्टवेअरच्या मदतीने प्रत्येक मतदाराचे कार्ड, मतदार याद्या यामधील फोटो जुळवून बघत आहेत. यामध्ये तब्बल २५ हजार मतदारांची डुप्लिकेट नावे आढळली आहेत. ही नावे हटवण्याचे काम सध्या सुरू असल्याचे जयपूरचे जिल्हाधिकारी सिद्धार्थ महाजन यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या