नवरात्र स्पेशल रेसिपी- राजगिऱ्याचा डोसा

सामना ऑनलाईन । मुंबई

आज नवरात्रीचा दुसरा दिवस, दुसरी माळ. आज ज्यांचा उपवास आहे त्यांच्यासाठी हा चटकदार आणि पौष्टिक राजगिऱ्याच्या डोसा देत आहोत. नक्की करून पाहा आणि नेहमीच्या उपवासाला आणखी हेल्दी बनवा.

साहित्य
२ वाट्या राजगिऱ्याचे पीठ, २-३ मिरच्या, १ चमचा जिरे, एक उकडलेले रताळे, डोसे तयार करण्यासाठी तूप, आवडीनुसार पाणी किंवा ताक, चवीपुरतं मीठ

कृती
मिरच्या, मीठ व जिरे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावेत.
उकडलेले रताळे कुस्करून राजगिऱ्याच्या पिठात मिसळावे.
यात मिक्सरमध्ये बारीक केलेले मिश्रण घालावे.
पाणी किंवा ताक मिसळून डोशाच्या पिठाप्रमाणे पीठ तयार करावे.
नॉनस्टिक पॅनवर तूप टाकून डोसे तयार करावेत.
तयार झालेले स्वादिष्ट डोसे दह्याबरोबर खावेत.

विशेष टीप-
तुमच्या आवडीनुसार या डोशामध्ये भाजलेले शेंगदाणे व बटाटा मिसळू शकता.
राजगिऱ्याच्या पीठाबरोबर डोशामध्ये साबुदाण्याचे पीठ घातल्यासही डोसा चविष्ट होतो.
डोशाबरोबर दह्याऐवजी खोबऱ्याची चटणीही छान लागते.