गुरुद्वारा सदस्य राजिंद्रसिंह पुजारी ‘तनखय्या’ घोषित, शहिदांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात  व्यत्यय

सामना प्रतिनिधी । नांदेड 

नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे सदस्य राजिंद्रसिंह पुजारी यांना माननिय श्री.पंचप्यारे साहिबान यांनी  आज तनखय्या घोषित केले. त्यांच्यावर पाच पवित्र ताखतां (पवित्र पीठ) मध्ये  सेवा करण्याची शिक्षा देण्यात आली आहे.

पुलवामा येथे शहीद झालेल्या भारतीय सैन्यातील जवानांसाठी नांदेडच्या सचखंड श्री हजुर साहिब यांच्या दरबारात अखंड पाठ (प्रार्थना) साहिबचे आयोजित करण्यात आली होते. ही प्रार्थना 17 फेब्रुरवारी रोजी सुरू झाली. त्या प्रार्थनेची समाप्ती १९ फेबु्रवारीला झाली. या पाठ दरम्यान होणार्‍या किर्तनाच्यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे सदस्य असलेल्या स.राजिंद्रसिंह  नरेंद्रसिंह पुजारी यांनी किर्तनात व्यतत्य आणला. जोरजोरात बोलून त्या किर्तनाच्या प्रवाह अडचणीत आणला. अनेक अपशब्दांचे उच्चारण करून धार्मिक कार्यक्रमात रोष व्यक्त करून धार्मिक मर्यादा भंग केली. त्या संदर्भाने जनता (संगत)चा रोष लक्षात घेवून माननीय श्री पंचप्यारे साहिबान यांच्या संमतीने आज दुपारी पंचप्यारे साहिबान यांची बैठक झाली.

सायंकाळी दरबार साहिबची पुजा, प्रार्थना झाल्यानंतर पंचप्यारे साहिबान यांनी स.राजिंद्रसिंह नरेंद्रसिंह पुजारीने अखंड पाठसाहिबच्या प्रार्थनेच्यावेळी केलेल्या जोरजोराच्या आवाजाने धार्मिक प्रक्रियेत आणलेले व्यवधान  लक्षात घेऊन त्यांना तनखय्या (बहिष्कृत) घोषित केले. पंचप्यारे साहिबान यांनी त्यांच्यावर शीख समाजातील पाच तख्त श्री हरमींदरसाहिब, श्री केशगड साहिब, दमदमासाहिब, श्री पटणा साहिब येथे जाऊन दोन तास जोडे (बुट) साफ करणे आणि दोन तास लंगरमध्ये भांडी साफ करण्याची शिक्षा दिली. तेथे शिक्षा पुर्ण झाल्यावर तेथील पंचप्यारे साहिबानचे शिक्षा पुर्ण केल्याचे प्रमाणपत्र आणल्यानंतर श्री हजुरसाहिब अबचलनगर, नांदेड येथे सुध्दा ती सेवा करावी आणि अखंड पाठ आयोजित करून त्याचा समाप्तीच्या अगोदर लेखी स्वरुपात माफी मागावी त्यानंतरच त्यांच्या माफीसाठी अरदास (प्रार्थना) होईल सध्या त्यांच्याकडे असलेल्या बकरा झटकावण्याच्या सेवेला सुध्दा बंद करण्यात आले आहे.

याबाबत नवनिर्वाचित सदस्य स.रविंद्रसिंह बुंगई यांनी पंचप्यारे साहिबान यांनी दिलेल्या शिक्षेला दुजोरा दिला आहे. शीख धर्मात राष्ट्रपती ग्यानी झैलसिंह, केंद्रीय गृहमंत्री बुटासिंग, पंजाबचे विक्रमजीतसिंह मजिठिया यांना सुद्धा असेच तनखय्या (बहिष्कृत) घोषित करण्यात आले होते अशी माहिती  स.रविंद्रसिंह बुंगई यांनी दिली.