राजीव महर्षी नवे ‘कॅग’चे प्रमुख, सुनील अरोरा मुख्य निवडणूक आयुक्त

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशाच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकपदी (कॅग) माजी केंद्रीय गृहसचिव राजीव महर्षी  यांची तर मुख्य निवडणूक आयुक्तपदी सुनील अरोरा यांची नियुक्ती केल्याची घोषणा केंद्र सरकारने आज केली. राजीव महर्षी हे आजच केंद्रीय गृह सचिव पदावरून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांची नवे ‘कॅग’चे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुख्य निवडणूक आयुक्तपदावरून जुलैमध्ये नसीम झैदी हे निवृत्त झाल्याने हे पद रिक्त होते. अरोरा केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण, कौशल्य विकास आणि उद्योग विभागाचे सचिव होते.