‘एसबीआय’च्या अध्यक्षपदी रजनीश कुमार यांची नियुक्ती

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्र सरकारने ‘एसबीआय’च्या अध्यक्षपदी रजनीश कुमार यांची आज नियुक्ती केली. मावळत्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य ६ ऑक्टोबरला सेवानिवृत्त होत आहेत. कॅबिनेटच्या निवड समितीने रजनीश कुमार यांच्या नियुक्तीला बुधवारी मंजुरी दिली. तीन वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.