राजस्थानात ओबीसी आरक्षण आता २६ टक्के

सामना ऑनलाईन । जयपूर

राजस्थानात गुज्जर समाजासह पाच जातींना ओबीसी प्रवर्गातून ५ टक्के आरक्षण देण्याच्या विधेयकाला आज विधानसभेत मंजुरी देण्यात आली. यामुळे ओबीसी आरक्षणाची मर्यादा २१ टक्क्यांवरून २६ टक्के झाली आहे तर राजस्थानात एकूण आरक्षण ५४ टक्के झाले आहे.
शिक्षण आणि सरकारी नोकऱयांमध्ये आरक्षण मिळावे अशी गुज्जर समाजाची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. यापूर्वीही राजस्थान सरकारने गुज्जर समाजाला ५ टक्के आरक्षण विशेष मागासवर्गीय तरतुदीखाली दिले होते. मात्र, उच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले होते. त्यानंतर राजस्थान सरकारने आरक्षणासंदर्भात उच्चस्तरीय समिती नेमली होती. या समितीने गुज्जर समाजासह पाच जातींना इतर मागसवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) आरक्षण देण्याची शिफारस केली. यापूर्वी राजस्थानात ओबीसी प्रवर्गासाठी २१ टक्के आरक्षण होते. आता २६ टक्के झाले आहे.