राजू शेट्टींनी भाजपाची ऑफर धुडकावली

सामना ऑनलाईन, सांगली

सत्तेतून बाहेर पडलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आमीष दाखवून पुन्हा सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आणखी एक मंत्रीपद देऊ असं म्हटलं होतं. यावर राजू शेट्टी यांना विचारलं असता ते म्हणाले की आमच्या पक्षाला राज्य आणि केंद्र स्तरावर शेतकऱ्यांची संघटना मजबूत करायची  असल्याने आम्हला सत्तेत राहणे अडचणीचे आहे.त्यामुळे सत्तेचे पद स्वीकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही

सत्तेतून बाहेर पडायचा निर्णय घेतल्यानंतर वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनीही पदाचा राजीनामा दिला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारला नसल्याचं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. सत्तेत सहभागी झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सदाभाऊ खोत यांचं नाव मंत्रिपदासाठी पुढे केलं होतं. त्यांच्यापाठोपाठ तुपकर यांना महामंडळाचं अध्यक्ष बनवलं होतं. राजू शेट्टी यांच्यासोबतच्या मतभेदांमुळे खोत यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.