महाआघाडीत बिघाडी; राजू शेट्टी यांचे एकला चलो रे

35

सामना ऑनलाईन । मुंबई

महाआघाडीत जागावाटपाबाबत तोडगा निघाला नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ‘एकला चलो रे’ ची भूमिका स्वीकारली आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना महाआघाडीत सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

राजू शेट्टी यांनी जागावाटपात महाआघाडीकडे चार जागा मागितल्या होत्या. हातकणगंलेसह माढा, बुलढाणा आणि वर्धा या चार जागांची मागणी त्यांनी केली होती. माढामधून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उभे राहण्याची शक्यता आहे. तर इतर तीन जागांबाबतही महाआघाडीकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने राजू शेट्टी यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. स्वामिभानी शेतकरी संघटनेची कार्यकारिणी लवकरच जाहीर होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या