राखी सावंतची आचरट इच्छा


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

वादग्रस्त वक्तव्य करून कायम चर्चेत राहण्याचा आटापीटा करणारी अभिनेत्री राखी सावंत हिने पुन्हा एकदा आचरट इच्छा व्यक्त केली आहे. इन्स्टाग्रामवर तिने आपल्याला स्तनदान करायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. आपणही समाजाचे देणे लागतो. यामुळेच हे दान आपण करणार असल्याचं तिनं म्हटलं आहे, राखीचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

राखीने बोलताना डोळे दान करणाऱ्या ऐश्वर्या रायचंही कौतुक केलं आहे. अनेकजण अवयवदान करून समाजसेवा करत असतात. मी ही एक अभिनेत्री असून स्तनदान करू इच्छित आहे. बघूया कोणाला मिळतात ते, असं बोलून राखीने नेटकऱ्यांची उत्सुकता चाळवण्याचा प्रयत्न केला आहे.

तुम्हांला माहीत नसेल, पण ज्या महिलेला स्तनांचा कॅन्सर होतो तिचे स्तन काढले जातात. मग मी त्यांना स्तनदान का नाही करू शकत, असा सवालही राखीने आधी केला होता. राखीच्या या व्हिडीओवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.


View this post on Instagram

#aishwaryaraibachchan #aishwaryarai

A post shared by Rakhi Sawant Official (@rakhisawant2511) on