एम.आय.आर.सी. मधील जवानांना विद्यार्थिनींनी बांधल्या राख्या

35

सामना प्रतिनिधी । नगर

देशातील सर्व बहिणींचे रक्षण करणारे हिंदुस्थानी लष्करातील जवान रक्षा बंधनाच्या दिवशी आपले कर्तव्य बजावत असतात. त्यांना आपल्या बहिणीकडे जाता येत नाही. हा सणाचा गोडवा त्यांच्या सोबत साजरा करण्याच्या दृष्टीकोनाने वाळुंज पब्लीक स्कुल मधील विद्यार्थिनींनी एम.आय.आर.सी. मधील जवानांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

मुलींनी स्वत: तयार केलेल्या राख्या जवानांना बांधून, शुभेच्छा पत्र भेट दिले. यावेळी कर्नल विवेक चौहान, मेजर भागीरथ सोमयाजी, सुभेदार मेजर उमेश कुमार आदी लष्करातील अधिकार्‍यांसह जवान उपस्थित होते. शाळेच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे कर्नल विवेक चौहान यांनी कौतुक केले. हा उपक्रम स्कुलच्या प्राचार्या सोनल गायकवाड यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागपुरे मॅडम, बेरड मॅडम व निमसे सरांनी परिश्रम घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या