मुली पळवण्याच्या वक्तव्यावर राम कदम यांची ‘फक्त’ दिलगिरी

सामना ऑनलाईन । मुंबई

घाटकोपर येथे आयोजित दहीहंडी उत्सव कार्यक्रमात हजारो लोकांसमोर मुली पळवून आणण्याच्या वक्तव्यावर चौफेर टिका होत असतानाच भाजप आमदार राम कदम यांनी या प्रकरणी फक्त दिलगिरी व्यक्त केली आहे. ‘महाराष्ट्रातील माता-भगिनी यांचा सन्मान माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. सर्वोच्च स्थानी आहे. त्यामुळे कोणताही खुलासा न करता मी अत्यंत नम्रपणे दिलगिरी व्यक्त करतो’, असे राम कदम म्हणाले आहेत.

भाजपने बेटी भगाव कार्यक्रम सुरू केला का? उद्धव ठाकरे कडाडले
राम कदमांवर गुन्हा दाखल करा; राज्यपाल, मुख्यमंत्री, राज्य महिला आयोगाकडे तक्रार
राम कदमांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल, अभिनेत्रीच्या डायलॉगसाठी केला गोविंदांचा अपमान
राम कदम यांच्या पुतळ्याचं दहन, राज्यात निषेध मोर्चे
महाराष्ट्राच्या रणरागिणीचं राम कदम यांना ओपन चॅलेंज, सोशल मीडियावर प्रचंड पाठिंबा