याच वर्षी राम मंदिराचे काम सुरू होईल: सुब्रमण्यम स्वामी

53

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

या वर्षीच राम मंदिराच्या निर्माणाचे काम सुरू होईल असे वक्तव्य भाजपचे वरिष्ठ नेते खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे. तसेच राम मंदिरानंतर काशी आणि मथुराचा क्रमांक आहे असेही स्वामी म्हणाले. बनारसमधील आणिबाणीच्या 44 व्या वर्धापन दिनानिमित्त एका कार्यक्रमात ते बोलत होते.

स्वामी म्हणाले की, “राम मंदिराप्रकरनी सरकारने कोर्टाने जाणे ही घोडचूक होती. ती जमीन सरकारच्या ताब्यात होती. तेव्हा ती जमीन राम मंदिरासाठी द्यायला पाहिजे होती. मंदिराच्या बांधकामचा मार्ग लवकरच मोकळा होईल. केंद्र सरकारलाही मी हाच मार्ग सांगितला आहे आणि हा सोपा मार्ग आहे.”

तसेच “या वर्षी राम मंदिराच्या बांधकामाचे काम सुरू होईल मग काहीही होऊदे. वर्ष संपायला अजून सहा महिने बाकी आहेत. सरकारने जमीन दिली तर लगेच काम सुरू होईल.” सर्व गोष्टींची तयारी झाली असून दोन वर्षात राम मंदिर बनून पूर्ण होईल असेही स्वामी म्हणाले. राम मंदिरानंतर मथुरेतील श्रीकृष्न जन्मभूमी आणि त्याच्या संबंधित ईदगाह वादही संपुष्टात येईल. हा वाद अयोध्येपेक्षा वेगळा असल्याचेही स्वामींनी नमूद केले.

आपली प्रतिक्रिया द्या