राम विलास पासवान यांच्यावर त्यांच्या मुलीची सडकून टीका

82

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांच्यावर त्यांची मुलगी आशा पासवानाने सडकून टीका केली आहे. पासवान यांनी राबडी देवींवर टीका करताना त्यांना अंगठाछाप मुख्यमंत्री म्हटले होते त्यावरून आशा या भडकल्या असून त्यांनी पासवान यांना राबडी देवीची माफी मागण्यास सांगितले आहे. तसे न केल्यास त्यांनी लोक जनशक्ती पार्टीच्या कार्यालयासमोर धरणे धरण्याचा इशारा देखील दिला आहे.

रामविलास पासवान यांच्या घरात बंड, वडिलांविरोधात निवडणूक लढवण्याचा मुलीचा निर्णय

पासवान यांनी गेल्या आठवड्यात राजदवर टीका करताना राबडी देवी यांना अंगठाछाप मुख्यमंत्री म्हटले होते. यावरून आशा पासवान भडकल्या असून त्यांनी त्यांच्या वडिलांना खडे बोल सुनावले आहेत. ‘माझ्या बाबांनी राबडी देवींचा अपमान केला आहे. माझी आई देखील अशिक्षित होती त्यामुळे त्यांनी माझ्या आईला सोडले व दुसरे लग्न केले. त्यांनी लवकरात लवकर राबडी देवींची माफी मागावी नाहीतर मी त्यांच्या पक्षकार्यालया समोर आंदोलन करेन’, असा इशारा आशा पासवान यांनी दिला आहे.

आशा पासवान ही राम विलास पासवान व त्यांची पहिली बायको राज कुमारी देवी यांची मुलगी आहे. पासवान यांनी राज कुमारी देवींना घटस्फोट देऊन रीना पासवान यांच्याशी लग्न केले, त्या दोघांना चिराग पासवान हा मुलगा आहे. आशा पासवानचा नवरा अरुण साधू याने गेल्या वर्षी लालू प्रसाद यादव यांच्या राजद पक्षात प्रवेश केला होता.

summary : Ram vilas Paswan daughter threatens stir over his angootha chhap remark against Rabri Devi

आपली प्रतिक्रिया द्या