काँग्रेस अध्यक्षांनी आत्मसन्मान गमावला; रामचंद्र गुहा यांची टीका

138

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयामुळे काँग्रेससमोरील अडचणी वाढल्या आहेत. 2014 च्या निवडणुकीत 44 जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या तर आता 52 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ रामचंद्र गुहा यांनी काँग्रेसवर टीका करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आत्मसन्मान गमावला असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कोणतीही चमक दाखवू शकलेली नाही. तसेच स्वतः राहुल गांधी अमेठी मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, असे गुहा यांनी म्हटले आहे.

रामचंद्र गुहा यांनी ट्विटरवरून राहुल यांच्या नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एवढ्या सुमार कामगिरीनंतरही राहुल यांनी राजीनामा दिला नाही, ही आश्चर्याची बाब आहे.
राहुल यांनी आपला आत्मसन्मान आणि राजकीय स्थान गमावले आहे. त्यामुळे आता काँग्रेसला नव्या नेतृत्वाची गरज आहे. मात्र, काँग्रेसकडे नेतृत्वही नसल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव युपिए अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिला आहे. काँग्रेस पक्षाच्या कार्यकरीणीच्या शनिवारी होणाऱ्या बैठकीत याबाबत चर्चा होणार आहे. रामचंद्र गुहा यांनी पाच वर्षात मोदी सरकारवर कडाडून टीका केली होती. काँग्रसच्या दारुण पराभवामुळे सर्वच स्तरातून काँग्रेसवर टीका होत आहे. तसेच काँग्रेसमध्ये राजीनामा देण्याचे सत्र सुरू झाले आहे. उत्तर प्रदेशचे पक्षाचे अध्यक्ष राज बब्बर आणि अमेठी जिल्हा अध्यक्षांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यातच रामचंद्र गुहा यांनी राहुल यांनी आत्मसन्मान आणि राजकीय स्थान गमावल्याने त्यांनी राजीनामा द्यावा असे म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या