…तर पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीतून सुटका होऊ शकते, आठवलेंनी सुचवला मार्ग

सामना प्रतिनिधी । नगर

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पक्षाला 61 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने नगर येथे रिपब्लिकन पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी आठवले यांनी पत्रकारांशा संवाद साधला. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती आणि विरोधकांच्या आंदोलनावर त्यांनी भाष्य केले.

भन्नाट ऑफर… पेट्रोल-डिझेलच्या खरेदीवर बाईक, लॅपटॉप ‘फ्री’

पेट्रोल व डिझेलचे भाव कमी झाले पाहिजे याबद्दल आमचे दुमत नाही. विरोधकांनी जे बंदचे आवाहन केले तो बंद, म्हणावा तसा यशस्वी झालेला नाही. बंद यशस्वी होऊ शकला नाही, अशी टीकाही आठवले यांनी केली. पेट्रोल व डिझेलच्या संदर्भामध्ये जर राज्य सरकारने लावलेले कर कमी केले तरच त्यातून मार्ग निघू शकतो. त्या संदर्भातली बोलणीसुद्धा सरकारच्या माध्यमातून सुरू असल्याचेही आठवले यांनी यावेळी सांगितले.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार अपयशी

आरक्षणाच्या बाबतीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असताना त्यांनी कोणताच निर्णय घेतला नाही. आज ते आरक्षणाच्या विषयांमध्ये बोलू लागले आहेत. वास्तविक पाहता मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी भूमिका आपण या अगोदरच मांडली होती. जर सर्वच घटकांना आरक्षण द्यायच असेल तर यामध्ये कायद्यात बदल करावे लागणार असून 50 टक्‍क्‍यांवरून ते 75 टक्‍क्‍यांवर गेले तरच सर्वांना आरक्षणाचा लाभ मिळू शकेल, असे आठवले यांनी सांगितले.

एकत्र निवडणूका व्हाव्या अशी सरकारची भूमिका…

याअगोदर सुद्धा लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्रित झालेल्या आहेत. त्यामुळे आता यावेळीही निवडणुका एकत्र व्हाव्यात, अशी सरकारची भूमिका आहे. खर्च टाळण्यासाठी एकत्रित निवडणुका व्हाव्यात असे वाटते आहे. महाराष्ट्रामध्ये लोकसभा व विधानसभा एकत्र येत नाहीत. एकत्रित निवडणूक करायची असेल तर सर्वांनी याबद्दल विचार केला पाहिजे, असेही आठवले म्हणाले.