रमेश तावडे, अरुण दातार, बिभीषण पाटील यांना ‘जीवनगौरव’

सामना प्रतिनिधी । मुंबई

तब्बल तीन वर्षांपासून रखडलेले शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अखेर सोमवारी जाहीर झाले. महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी करणाऱया खेळाडूंना या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात येत असते. रियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्क करणारी धाकपटू ललिता बाबर, रोइंगपटू दत्तू भोकनाळ, वेटलिफ्टिंगमधील ओंकार ओतारी व गणेश माळी, क्रिकेटर अजिंक्य रहाणे व रोहित शर्मा, हॉकीपटू युकराज काल्मीकी, सात समुद्रांची मोहीम फत्ते केलेला जलतरणपटू रोहन मोरे यांच्यासह आणखी काही नामांकित पुरस्कारार्थींना शिकछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. क्रीडामंत्री किनोद ताकडे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. गेल्या तीन कर्षांचे एकूण १९५ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. २०१४-१५ साठी पुण्यातील रमेश तावडे (ऍथलेटिक्स), २०१५-१६ साठी पुण्यातीलच अरुण दातार (सूर्यनमस्कार) आणि २०१६-१७ साठी कोल्हापूरचे बिभीषण पाटील (बॉडीबिल्डिंग) यांना सर्वोच्च ‘जीकनगौरक’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

पुरस्कारांसाठी ७७६ अर्ज आले होते. यातून ऑनलाइन पद्धतीने १९५ पुरस्कर्त्यांची निकड करण्यात आली. यात २०१४-१५ साठी ७२, २०१५-१६साठी ५९, तर २०१६-१७ साठी ६४ पुरस्कारार्थी आहेत. ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत सानिया मिर्झाच्या साथीने महिला दुहेरीत देशाचे प्रतिनिधित्व करणारी प्रार्थना ठोंबरे, ग्रॅण्डमास्टर अक्षयराज कोरे, एव्हरेस्टवीर आशीष माने, बॅडमिंटनपटू अक्षय देवलकर व दिव्यांग खेळाडू सुयश जाधव आदींना नामांकित पुरस्कारार्थी म्हणून ‘शिवछत्रपती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. १७ फेब्रुवारीला ‘गेट ऑफ इंडिया’ला राज्यपालांच्या हस्ते हा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार सोहळा रंगणार आहे.

नामांकित पुरस्कारार्थी : बुद्धिबळ : ग्रॅण्डमास्टर अक्षयराज कोरे (पुणे), किदित गुजराथी, (नाशिक). लॉन टेनिस : प्रार्थना ठोंबरे (सोलापूर). जलतरण : मंदार दिकसे (कोल्हापूर). हॉकी : युकराज कल्मीकी, देकिंदर काल्मीकी. कबड्डी : नितीन मदने, अभिलाषा म्हात्रे, किशोरी शिंदे. केटलिफ्टिंग : ओंकार ओतारी, गणेश माळी. एक्हरेस्टकीर : आशीष माने (सातारा). क्रिकेट : रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे. जलतरण : सौरभ सांगकेकर. बॅडमिंटन : अक्षय देकलकर. ऍथलेटिक्स : ललिता बाबर. रोइंग : दत्तू भोकनाळ. मार्गदर्शक : प्रकीण आमरे. खाडी क समुद्र पोहणे : रोहन मोरे. दिक्यांग खेळाडू : सुयश जाधक.

‘जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याने क्रीडा कारकीर्दीचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय. थोडी उशिरा का होईना पण कामाची पोचपावती मिळाली. या पुरस्काराने क्रीडा क्षेत्रासाठी आणखी काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. खेळाडू, क्रीडा संघटनेवरील पदाधिकारी, संघाचा मॅनेजर अशा विविध पदांवर काम करताना खूप मजा आली.’
– रमेश तावडे