छोट्या जिल्ह्यांच्या मुद्द्यावरून विखे पाटलांची विखारी टीका

सामना ऑनलाईन । शिर्डी

पालक मंत्री राम शिंदे यांच्या जिल्हा विभाजनाच्या मुद्द्याचा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज खरपूस समाचार घेतला. छोट्या छोट्या जिल्ह्यांचा मुद्दा उपस्थित करून पालक मंत्री त्यांचा राजकीय स्वार्थ साधत असल्याची टीका विखे पाटलांनी केली आहे.

मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करून छोटे छोटे जिल्हे झाले तर ते सर्वांच्याच दृष्टीने ते चांगले आहे. मात्र केवळ राजकीय स्वार्थासाठी या मुद्द्यावरून बुध्दीभेद करणे उचित ठरणार नाही, अशा शब्दात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पालकमंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.