अंजली आणि गावकऱ्यांच्या साथीने राणा वज्रकेसरीसाठी पुन्हा उभा राहिलाय. अंजलीला वाढदिवसाची भेट म्हणून वज्रकेसरीची गदा आणण्याचा राणाचा निश्चय आहे.
येत्या २६ नोव्हेंबरला राणा आणि दलजितचा जंगी कुस्तीचा सामना रंगणारेय.
या महाएपिसोडसाठी १७ ते १९ नोव्हेंबरला कोल्हापूर जवळील इचलकरंजी इथे शूटिंग पार पडले.
शूटिंगच्या पहिल्या दिवशी खऱ्या खुऱ्या पैलवानांच्या अनेक प्रदर्शनी कुस्त्याही इथे झाल्या.
दुखण्याला घाबरत नाही तो सच्चा पैलवान! त्यामुळे राणादा दलजितला धुळ चारत मैदान मारणार यात शंकाच नाही. हा अटीतटीचा सामना बघा २६ नोव्हेंबर सायं ८ वा. झी मराठी आणि झी मराठी एचडीवर!