Video: रणबीर आलियावर भररस्त्यात चिडला, ती मात्र गप्पगप्प

1

सामना ऑनलाईन । मुंबई

आलिया भट-रणवीर सिंग यांचा ‘Gully-Boy‘ हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला समीक्षकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने आलिया सध्या खूश आहे. मात्र बुधवारी गली बॉयच्या स्क्रिनिंगच्या वेळी आलिया व रणबीरचे भांडण झाल्याने आलियाच्या आनंदावर विरजण पडले आहे. रणबीर व आलियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात रणबीर आलियावर चिडलेला दिसतोय. त्यामुळे आलियाचा चेहरा देखील पडला आहे.


View this post on Instagram

#ranbirkapoor #aliabhatt today at the special screening of #gullyboy

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

आलिया व रणवीर हे गेल्या वर्षभरापासून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. सोनमच्या लग्नात एकत्र एन्ट्री घेतल्यानंतर यांच्या अफेयरच्या चर्चा रंगल्या होत्या. सध्या हे दोघे ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. या चित्रपटाच्या सेटवरचा देखील एक व्हिडीओ व काही फोटो मध्यंतरी व्हायरल झाले होते. त्यातही रणबीर व आलिया यांचे भांडण झाल्यासारखे दिसत होते. आता तर रणबीर आलियावर चिडलेला या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी देखील रणबीरवर टीका केली आहे. तसेच आलियाला ब्रेकअप करण्याचा सल्ला देखील दिलाय.