रंगात रंगला श्रीरंग! पंढरपुरात ‘रंगपंचमी’ जल्लोषात

196

सामना प्रतिधिनी । पंढरपूर

राज्यभरात आज रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. पंढरपूरमध्येही रंगपंचमीचा जल्लोष दिसून आला. पंढरपूरच्या वारीला जसं महत्व आहे तसं श्री विठ्ठलाच्या रंगपंचमीला विषेष महत्व आहे.

राज्यात रंगपंचमी उत्साहात, बच्चेकंपनीसह तरुणाईने लुटला आनंद

पंढरपूरचे श्री विठ्ठल-रखुमाई म्हणजे साक्षात श्रीकृष्ण आणि राधिकाचा अवतार आहेत. त्यामुळे पंढरपूरमधील श्री विठठल-रखुमाईच्या मंदिरामध्ये होळी ते रंगपंचमी असा सहा दिवस रंगोत्सव साजरा केला जातो. या सहा दिवसांमध्ये देवाला दररोज पांढरा पोशाख घातला जातो आणि त्यावर नैसर्गिक रंगाची उधळण केली जाते.

रंगपंचमीच्या दिवशी देवाची पंचमी साजरी केल्यानंतर देवाचा डफ निघतो या डफावर लोक रंगाची मुक्तपणे उधळण करून रंगपंचमी साजरी करतात. प्रथेप्रमाणे यमाई ट्रॅक येथे श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करून रंगपंचमीला सुरुवात करण्यात आली. यावेळी जेष्ठ नागरिक आणि तरुणी-तरुणींनी डीजेच्या तालावर ठेका धरला होता. यावेळी एकमेकांना नैसर्गिक रंग लावून रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या