‘रंगकर्मी’ करंडक एकांकिका स्पर्धा रंगली

सामना ऑनलाईन । मुंबई

 सेजल एंटरटेन्मेंट आयोजित रंगकर्मी करंडक आंतरराष्ट्रीय एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी 10 ते 13 नोव्हेंबर या कालावधीत दादरच्या पाटील मारुती सभागृहात यंदा उत्साहात पार पडली. स्पर्धेचे आयोजन सेजल एंटरटेनमेंटचे अध्यक्ष प्रकाश पवार यांनी केले होते. त्यासाठी प्रियांका कासले, अंकिता ढोकळे, जितेंद्र, या कार्यकर्त्यांची मोलाची साथ होती. उद्घाटन सुप्रसिद्ध कवी-अभिनेता किशोर कदम यांच्या हस्ते झाले. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आलेली ही पहिलीच एकांकिका स्पर्धा असून यात अमेरिका, दुबई तथा सिंगापूर आदी देशांतील मराठी एकांकिकांनी यात सहभाग घेतला क एकूण 57 संघानी या स्पर्धेत आपला अभिनय आविष्कार नोंदवला. स्पर्धेची अंतिम फेरी 17 डिसेबर रोजी गिरगावच्या साहित्य संघ मंदिर येथे रंगणार आहे. अंतिम फेरीसाठी निकड झालेल्या 10 एकांकिकांमध्ये ‘कुआं माँ डूब जाऊंगी’, ‘बिफोर दी लाइन’, ‘जाकेदा’, ‘माईक’, ‘फोबिया’, ‘अफसाना’, ‘अच्छे दिन कह चार दिन’, ‘तुरटी’, ‘जानकीच्या बाबांचा धिकरपक्षी’ आणि ‘देसरूड’ या नाटकांचा समावेश आहे. या स्पर्धेकरिता नाटककार भालचंद्र कुबल व समीर पेणकर यानी परिक्षक म्हणून काम पाहिले.