विरोधात बोलणाऱ्यांची गळचेपी केली जातेय!; ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारेंचा हल्लाबोल

सामना प्रतिनिधी । नगर

‘‘लोकमान्य टिळक यांनी ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असे अग्रलेखातून ब्रिटिश सरकारला सुनावले होते, परंतु आज प्रसारमाध्यमांनी सत्ताधारी सरकारपुढे नांगी टाकली आहे. देशात सध्या विरोधात बोलणाऱ्यांची गळचेपी केली जात आहे. ही बाब गंभीर आहे. देशात एक-दोन घराणी अनेक सांस्कृतिक संघटनांवर ताबा मिळवीत असतील तर हे धोकादायक आहे. याबाबत आपण गप्प बसलो तर जनता आपल्याला माफ करणार नाही’’ असा हल्लाबोल ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी केला.

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने नगरमधील सावेडी उपशाखेने विभागीय साहित्य संमेलन आयोजित केले आहे. त्याचे संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे हे आहेत. संमेलनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.
रंगनाथ पठारे म्हणाले, ‘आजचे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय वर्तमान कसे आहे हे सांगायचे असेल तर ते भीती निर्माण करणारे आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत याला आपला आक्षेप नाही. आपल्या लोकशाही व्यवस्थेने त्यांना त्या जागी बसविले आहे. मात्र ज्या विचारधारेचा ते पुरस्कार करतात ती मला मान्य नाही. पण लोकशाही व्यवस्थेने त्यांना शीर्षस्थानी आणले आहे त्याचा एक नागरिक म्हणून मी आदर करतो. आज देशातील सगळ्या प्रकारच्या प्रसारमाध्यमांनी सत्ताधारी सरकारपुढे नांगी टाकली आहे. दादरी येथे काय झाले हे आपल्याला माहीत आहे. अशाच प्रकारच्या घटना राजस्थान, उत्तर प्रदेशसह इतरत्र भरपूर झाल्या आहेत. महाराष्ट्रही त्याला अपवाद आहे असे नाही.’

देशाची आणीबाणीच्या दिशेने वाटचाल
रामदास फुटाणे म्हणाले, ‘देशाची आणीबाणीच्या दिशेने वाटचाल सुरू असून राज्यकर्ते केवळ मतांसाठी आपल्याकडे पाहतात. गल्लीत तुमच्या जातीची मते किती आहेत यावर तुमची किंमत ठरते. चॅनेल्स एक-दोन कुटुंबांनी ताब्यात घेतले. पूर्वी आणीबाणीमध्ये १८ महिने कैदेत टाकले गेले, आता ३६ महिने टाकले जाईल अशी भीती वाटते.

  • D.P.Godbole,

    स्वातंत्र्य लढ्यात काहीही भाग न घेतलेले लोक अशा प्रकारे कोन्ग्रेस पक्षाचे मुखंड भाजप पक्षाच्या लोकांची संभावना करतात त्याच प्रकारे आणीबाणी पर्वाची काहीही झळ न पोचलेले लोक सध्या उगाचच आणीबाणीपेक्षाही भयंकर अशी उगाचच कावकाव करत सुटले आहेत कर नाही त्याला डर कशाची असा एक वाक्प्रचार मराठीत आहे तो साहित्यिक विसरले असावेत.

  • mahendrapadalkar

    अगदी बरोबर. या लोकांना मिळणारे विदेशी फंड बंद झाले. नोटाबंदि मुळे आणखी पंचाईत.