राणी मुखर्जींच्या वडीलांचे निधन

1

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हिचे वडील निर्माता, दिग्दर्शक व कथालेखक राम मुखर्जी यांचे रविवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या पार्थिवावर दुपारी दोन वाजता विले पार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

राम मुखर्जी यांनी हिंदी बरोबरच अनेक बंगाली चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. १९९६ साली त्यांनी बियेर फुल या चित्रपटाची निर्मिती केली होती. याच चित्रपटातून राणीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. १९९७ साली त्यांनी राजा की आएगी बारात चित्रपटाची निर्मिती केली होती.