साहसी! जखमी असूनही एका हाताने केली फलंदाजी

2
sanju-samson-batting

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

रणजी ट्रॉफीच्या उपांत्य पूर्व फेरीत केरळ आणि गुजरातची झुंज सुरू असताना स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या संजू सॅमसनने जबरदस्त साहस दाखवून दिले. जखमी असताना देखील संघाच्या अडचणीच्या काळात त्याने एका हाताने फलंदाजी करत धावफलक हलता ठेवला. त्याच्या या जिगरबाज वृत्तीचं सगळीकडे कौतुक होत आहे.

केरळकडून पहिल्या इनिंगमध्ये 34 चेंडूत 17 धावांवर खेळत असताना संजू सॅमसन जखमी झाला. त्याच्या रिंग फिंगरला जखम झाली. त्याला मैदान सोडावे लागले. केरळ या पहिल्या डावात 185 धावा केल्या. त्यानंतर गुजरातचा डाव 162 धावांवर संपला. त्यानंतर दुसऱ्या डावात केरळच्या विकेटही पटापट पडल्या. अखेर संजू सॅमसन जखमी असताना देखील मैदानात उतरला. एका हाताने फलंदाजी करत त्याने नऊ चेंडू खेळले. ज्यामुळे संघाला मोठा फायदा झाला. दुसऱ्या खेळात केरळने 171 धावा केल्या आणि गुजरात समोर 194 धावांचे लक्ष्य दिले. मात्र केरळच्या टिचून माऱ्यापुढे गुजरात ढेपाळले आणि सामना केरळने जिंकला.