रत्नागिरी जिल्ह्यातील 20 शाळांना आदर्श पुरस्कार जाहीर

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हापरिषदेच्यावतीने जिल्ह्यातील 20 शाळांना आदर्श शाळा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 2 मार्च रोजी सकाळी शामराव पेजे सभागृहात पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त शाळा पुढील प्रमाणे आहेत. मंडणगड- जि.प.प्राथमिक शाळा तळेघर,जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा पाले क्र.1, दापोली-जि.प.प्राथमिक शाळा आसूद रेवाळेवाडी,जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा निगडे,खेड-जि.प.प्राथमिक शाळा सणवस घोणसेवणे,जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा दयाळ क्र.1,चिपळूण-जि.प.प्राथमिक शाळा दहिवली हि.नं.1,जि.प.प्राथमिक शाळा निवळी क्र.1,गुहागर-जि.प.प्राथमिक शाळा पांगारी सडेवाडी,जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा धामापूर क्र.4,रत्नागिरी-जि.प.प्राथमिक शाळा कळझोंडी क्र.1,जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा वाटद मिरवणे,लांजा-जि.प.प्राथमिक शाळा रिंगणे क्र.1,जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा पन्हळे क्र.1,राजापूर-जि.प.प्राथमिक शाळा कोंडसूर खूर्द क्र.2,जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा करक क्र.3 आणि विशेष पुरस्कार संगमेश्वर तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा माभळे जाधववाडी आणि जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा घाटिवळे कदमवाडी यांना जाहीर झाला आहे.