मिस्टर परफेक्शनिस्ट आणि खिल्जी येणार एकत्र

सामना ऑनलाईन । मुंबई

‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान आणि ‘बॉलिवूडचा बाजीराव’ म्हणजेच अभिनेता रणवीर सिंग हे दोघेही आपले काम अगदी चोख बजावत असतात. सध्या ते दोघेही त्यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असून ते लवकरच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. ते दोघेही पहिल्यांदा एका मोबाईल कंपनीच्या जाहिरातीत एकत्र काम करणार आहेत.

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ असे आमिरच्या आगामी चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाचे चित्रीकरण काही दिवसांपूर्वी पूर्ण झाले आहे. या चित्रपटात अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेत्री कतरीना कैफ, अभिनेत्री फातिमा सना शेखही दिसणार आहेत.

‘गली बॉय’ असे रणवीरच्या आगामी चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाचे दिग्दर्शन झोया अख्तर करणार आहे. रॅपर डिवाइन यांचा झोपडपट्टीत सुरू होऊन प्रसिद्ध ‘ रॅपर’ होण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखवला जाणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट पहिल्यांदा स्क्रीन शेअर करणार आहे.