कोर्टात साक्ष द्यायला जाणार्‍या बलात्कार पीडितेची आरोपीकडून गोळ्या घालून हत्या

2

सामना ऑनलाईन । गुरुग्राम

हरियाणामध्ये एक बलात्कार पीडित न्यायालयात साक्ष देण्यासाठी जात होती. तेव्हा आरोपीने तिचे अपहरण करून तिला गोळया घालून ठार केले आहे. गुरूग्राममधील ही घटना असून या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

गुरूग्राम मधील 22 वर्षीय युवतीचे आणि एका बाऊंससरचे प्रेमसंबंध होते. एका क्लबमध्ये दोन वर्षापूर्वी दोघांची ओळख झाली. तेव्हा त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. युवकाने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार बलात्कार केला. जेव्हा तरुणीने लग्नाबाबात विचारले तेव्हा तरुणाने नकार दिला.

यानंतर मुलीने तरुणाच्या विरोधात पोलिसांत बलात्काराची तक्रार दाखल केली. गुरूवारी काही कारणास्तव मुलीची साक्ष राहिली होती. तेव्हा शुक्रवारी तिची साक्ष होणार होती. न्यायालयत साक्ष देण्यासाठी जाताना आरोपीने पीडित मुलीचे अपहरण केले आणि तिला ही केस मागे घेण्याची धमकी दिली. तरुणीने जेव्हा नकार दिला तेव्हा तिला गोळ्या घालून ठार केले.

पोलिसांनी घटनास्थाळी जाऊन मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे व तरुणाच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.