राजस्थानमध्ये 70 वर्षीय काँग्रेस आमदारावर बलात्काराचा गुन्हा दाखल

1

सामना ऑनलाईन । जयपूर

राजस्थानमधील राजगढ येथील काँग्रेस आमदार जोहरी लाला मिणा (70) यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी काँग्रेस आमदारावर कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

जोहरी लाल मिणा हे राजगढ-लक्ष्मणगढ मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी गेल्या निवडणुकीत भाजपचे विजय समर्थलाल यांचा पराभव केला होता. आता लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असतानाच आमदारावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने काँग्रेस अडचणीमध्ये आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अद्याप जोहरी लाल मिणा यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलिले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने 10 एप्रिल रोजी राजगढ न्यायालयामध्ये जोहरी लाल मिणा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. दोन वर्षांपूर्वी आमदार जोहरी लाल मिणा हे सोबत घेून गेले होते आणि आमिष दाखवून बलात्कार केला. या प्रकरणी न्यायालयाने पोलिसांना तपास करण्यास सांगितले आहे.