नगर जिल्हा पुन्हा हादरला, घरात एकटी पाहून अकरावीच्या तरुणीवर बलात्कार

4

सामना प्रतिनिधी । जामखेड

नगर जिल्ह्यात अत्याचाराच्या घटना थांबताना दिसत नाहीये. जामखेड तालुक्यातील भोगलवाडी येथे घरात एकटी असल्याचे पाहून आरोपीने अकरावीच्या तरुणीवर बलात्कार केला. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून जामखेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामखेड तालुक्यातील भोगलवाडी (कुसडगाव) येथील ही घटना आहे. पीडिता ही आजी आजोबा व भावासोबत राहते. तर आई-वडील ऊसतोडणीसाठी इंदापूरला गेले आहेत. रविवारी अकरावीत शिकणारी पीडिता घरात एकटी होती. याचा गैरफायदा घेत आरीपी सचिन म्हणू वाघ याने घरात बळजबरीने प्रवेश करत तरुणीवर बलात्कार केला. शेतात गेलेले आजी-आजोबा घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पीडितेने आजी-आजोबांसह पोलीस स्थानक गाठत तक्रार दाखल केली असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पीडितेच्या तक्रारीनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सूदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आरोपी सचिन वाघ विरोधात भादवी 376 (1), 252, 254 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे हे करत आहेत.