फेसबुकवर मैत्री, पहिल्या भेटीत बलात्कार; 22 वर्षीय तरुणाला नागपुरात अटक

159

सामना प्रतिनिधी । नागपूर

फेसबुकवर मैत्री झालेल्या मुलीवर पहिल्याच भेटीत बलात्कार करून त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत वांरवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची घटना शहरात घडली आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर युवतीच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी आकाश गजानन टाले (22) या आरोपीस अटक केली आहे.

आकाश टाले नामक युवकाने सोशल मीडियावर गिट्टीखदान येथे राहत असणाऱ्या एका मुलीस फ्रेड रिक्वेस्ट पाठविली. त्यांची मैत्री झाल्यावर त्याने तिच्याशी चॅटिंग करणे सुरू केले. दोघांनी एकमेकांना मोबाइल फोन क्रमांक देखील दिला. यानंतर युवकाने पहिल्याच भेटीत युवतीवर बलात्कार केला. त्यानंतर पीडित मुलीची वारंवार भेट घेऊन जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. काही दिवसातच मुलीच्या घरच्यांना हे प्रेम प्रकरण समजले. आम्ही लग्न करणार आहोत असे त्यांनी घरी सांगितले. त्यानंतर लग्न करावे लागणार या भितीने आकाश भेटण्यास टाळाटाळ करत होता. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर युवतीच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी आकाश गजानन टाले (22) या आरोपीस अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या