‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’, म्हणत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, तिघांना अटक

18
फोटो - प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । गुहागर

‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’, असे सांगत अल्पवयीन मुलीवर तिघांनी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याची घटना गुहागरमध्ये घडली. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यामध्ये सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित अल्पवयीन मुलीच्या भावाने गुहागर पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक मार्च 30 मे या कालावधीत मोडकाआगर ( ता. गुहागर), आवाशी देऊळवाडी( ता. खेड), गुहागर एसटी स्टँड च्या मागे तीन ठिकाणी तिघांनी मोबाईलवर फोन करून पीडित मुलीला तुझ्यावर माझे प्रेम आहे असे सांगत बलात्कार केला.

दरम्यान या प्रकरणी गुहागर डेपोचा वॉचमन निलेश यशवंत चव्हाण, खेड वाशी देऊळवाडी येथील निखील राजन पिल्ले व गुहागर मोडकाआगघर येथील धीरज देवकर या तिघांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कलम 1860 प्रमाणे 376 (3), बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे 4, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम2012 चे 8, बालकांचे लैंगिक अपराधापासून पासून संरक्षण अधिनियम 2012 चे 12, अनुसूचित जाती जमाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार अधिनियम 1989 चे 3( 1) { w} { i} अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार 1989 3 (l) (w) (ii) अन्वये गुन्ह दाखल करण्यात आलाआहे. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या