लग्नाचं अमिष दाखवून महिला शिक्षिकेवर बलात्कार

सामना ऑनलाईन । नोएडा

नोएडामध्ये लग्नाचं अमिष दाखवून महिला शिक्षिकेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बलात्कारानंतर तरूणाने पीडित महिलेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल केला आहे. याप्रकरणी महिलेने पोलिसात धाव घेत तरूणाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला एका वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहे.

पीडित महिला ही राजस्थानची रहिवासी असून तिची शुभम नावाच्या तरूणाशी मैत्री झाली. शुभम अमेरिकेमध्ये राहतो. मात्र तो सुट्टीमध्ये हिंदुस्थानात आला होता. त्यानंतर शुभमने महिलेला लग्नाचं अमिष दाखवलं. नोएडामध्ये शुभमची बहिण राहत असल्यामुळे त्याने पीडित महिलेला साखरपुडा करण्यासाठी नोएडा येथे बोलावलं. त्याने तिची व्यवस्था एका गेस्ट हाऊसमध्ये केली. तरूणाच्या बोलण्याला फसून महिला आल्यानंतर त्याने मात्र तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचा अश्लील व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.