उद्योगपती रतन टाटा यांनी घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट

3

सामना ऑनलाईन । नागपूर

उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी संचालक रतन टाटा यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची संघमुख्यालयात नुकतीच भेट घेतली आहे. त्यांच्यात सुमारे दोन तास चर्चा झाली. रतन टाटा यांनी दुसऱ्यांदा भागवत यांची भेट घेतली आहे.

संघमुख्यालयात बुधवारी झालेल्या भेटीबाबतची कोणताही तपशील मिळालेला नाही. या भेटीमागे कोणताही उद्देश नसून ही औपचारिक भेट असल्याचे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडून सांगण्यात आले. या दोघांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. याआधी टाटा यांनी डिसेंबर 2018 मध्ये भागवत यांची भेट घेतली होती. तसेच ऑगस्ट महिन्यात संघाच्या एका कार्यक्रमात दोघे एका व्यासपीठावर आले होते. त्यावेळी भागवत यांनी रतन टाटा यांचे कौतुक केले होते. रतन टाटा यांचे विार ऐकण्यासाठी सर्व उत्सुक असतात. मात्र, अशा व्यक्ती बोलण्यापेक्षा आपल्या कामातूनच व्यक्त होत असतात. अशा व्यक्तीचे कामच बोलत असते, अशा शब्दांत भागवत यांनी टाटा यांचे कौतुक केले होते. सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आले आहे.