जिल्हयातील वीस शाळांना आदर्श पुरस्कार जाहीर

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हापरिषद शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हयातील वीस शाळांना आदर्श पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांची घोषणा शिक्षण सभापती दीपक नागले यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शाळांच्या कामगिरीची दखल घेऊन आदर्श पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रत्येक तालुक्यातील दोन शाळांना आदर्श पुरस्कार जाहीर करण्यात आला. तसेच जिल्हयातील दोन शाळांना विशेष आदर्श पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये वरिष्ठ प्राथमिक शाळा आणि कनिष्ठ प्राथमिक शाळेचा समावेश आहे. शिक्षण सभापती दीपक नागले यांनी आज आदर्श शाळा पुरस्कारांची घोषणा केली. त्यामध्ये मंडणगड- जिल्हापरिषद प्राथमिक शाळा वडवली आणि जिल्हापरिषद पूर्ण प्राथमिक शाळा घराडी क्र.१, दापोली- जिल्हापरिषद प्राथमिक शाळा शिरशिंगे, जिल्हापरिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुंभवे, खेड- जिल्हापरिषद प्राथमिक शाळा खवटी मंडलीक कोंड, जिल्हापरिषद पूर्ण प्राथमिक शाळा सवेणी क्र.१, चिपळूण- जिल्हापरिषद प्राथमिक शाळा वहाळ क्र.१, जिल्हापरिषद पूर्ण प्राथमिक शाळा रावळगांव क्र. १, गुहागर-जिल्हापरिषद प्राथमिक शाळा वेळंब क्र. ४, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मासू क्र.१, संगमेश्वर- जिल्हापरिषद प्राथमिक शाळा कळंबस्ते बौध्दवाडी, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओझरे खुर्द, रत्नागिरी- जिल्हापरिषद प्राथमिक शाळा नेवरे देवपाट, जिल्हापरिषद पूर्ण प्राथमिक शाळा कशेळी क्र.१, लांजा- जिल्हापरिषद प्राथमिक शाळा व्हेळ क्र. २, जिल्हापरिषद पूर्ण प्राथमिक शाळा भांबेड क्र.४, राजापूर- जिल्हापरिषद प्राथमिक शाळा आंगले क्र.२ आणि जिल्हापरिषद पूर्ण प्राथमिक शाळा नाणार मराठी क्र.१ या शाळांचा समावेश आहे. चार शाळांना विशेष पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. त्यामध्ये खेड- जिल्हापरिषद प्राथमिक शाळा कर्जी कुणबी, जिल्हापरिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुशिवडे क्र.१, लांजा- जिल्हापरिषद प्राथमिक शाळा वेरवली खुर्द राणेवाडी, जिल्हापरिषद पूर्ण प्राथमिक शाळा हरळ राजापूर या शाळांचा समावेश असल्याचे सभापती दीपक नागले यांनी सांगितले. यावेळी जिल्हापरिषद सदस्य रोहन बने उपस्थित होते.