खासदार विनायक राऊत व आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नातुन उक्षी रेशन दुकान रस्त्याचे काम पुर्ण

67

सामना प्रतिनिधी ।  संगमेश्वर

रत्नागिरी तालुक्यातील उक्षी गावात आज शिवसेनेच्या मध्यामातुन विकास कामांचा धुमधडाका सुरू असतानाच उक्षी गावातील रेशनदुकानाकडे जात असलेल्या रस्ता गेली कित्येक वर्ष खराब झाला होता.त्या रस्त्याचे काम गावातील तरूण कार्यकर्ते रमजान गोलंदाज यांच्या मागणीतून आणि  खा. विनायक राऊत, आ.उदय सामंत व किरणशेठ सामंत यांच्या विशेष प्रयत्नातुन उक्षी रेशनदुकान कडे जाणारा रस्ता पुर्ण झाल्याने सर्व ग्रामस्थांच्यावतीने त्यांचे आभार मानले आहे.

उक्षी हे तालुक्याचे शेवटचे ठोक आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात उक्षीचा समावेश असून अगदी नदीकाठावरून डोंगर दर्यात विखुरलेला हा गाव आहे. शिवसेनेच्या माध्यमातुन गावात अनेक विकास कामे पुर्ण झाली आहेत. अतिशय महत्त्वाचा रस्ता जो गावाच्या रेशनदुकानाकडे जाणारा होता त्या रस्त्यावर ग्रामस्थांना नीट चालता येत नव्हते. ही अडचण रमजान गोलंदाज, उक्षीचे माजी सरपंच अन्वर गोलंदाज,ग्रामपंचायत सदस्य किरण जाधव यांनी खा.विनियक राऊत व आ.उदय सामंत यांच्या कानवर घालताच तातडीने हा रस्ता करण्यास सांगन्यात आले.

आमदार खासदार आणि किरण सामंत यांच्या विशेष प्रयत्नातुन हा रस्ता समस्या मांडली व रस्ता पुर्ण झाला. या रस्त्याचा वापर पुर्ण गाव करत असून तरूण, वयोवृद्ध, महिला, पुरूष ही मंडळी या रस्त्यावरून रेशन नेण्यासाठी रेशनदुकानात येतात. त्यांना या रस्त्यावरून नीट चालता येत नव्हते मात्र हा रस्ता लोकांच्या सेवेसाठी पुर्ण झाला आहे. त्यामुळे समस्त उक्षी ग्रामस्थानी खा.विनायक राऊत व आ.उदय सामंत यांचे मनापासून आभार मानले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या