रत्नागिरीत २१ शाळा ‘आदर्श’ पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आज जिल्ह्यातील २१ शाळांना आदर्श शाळा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा माध्यमिक शिक्षक पतपेढीमध्ये संपन्न झाला.

जिल्हा परिषद आदर्श शाळा पुरस्कार वितरण समारंभासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, निमंत्रित प्रतिनिधी विकास नलावडे आणि इतर अधिकारीवर्ग उपस्थित होता. यावेळी जिल्ह्यातील २१ शाळांना आदर्श शाळा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये कनिष्ठ प्राथमिक शाळा – मंडणगड – जि. प. प्राथमिक शाळा नारगोली, दापोली – प्राथमिक शाळा आंजर्ले, चिखलतळे क्र.३, खेड – जि. प. शाळा दिवाणखवटी गणपती, चिपळूण – जि. प. शाळा दळवटणे नलावडेवाडी, गुहागर – जि. प. प्राथमिक शाळा मळण, तळेकोंड, संगमेश्‍वर – जि. प. प्राथमिक शाळा निगुडवाडी, रत्नागिरी – जि. प. प्राथमिक शाळा कोळंबे क्र.५, लांजा – जि. प. प्राथमिक शाळा वाघणगाव क्र.२, राजापूर – जि. प. प्राथमिक शाळा केळवडे. वरिष्ठ प्राथमिक शाळा – मंडणगड – जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा पेवे क्र.१, दापोली – जि. प. केंद्र शाळा किन्हळ, खेड – जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा शिवखुर्द, चिपळूण – जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा कळवंडे, नाचरेवाडी, गुहागर – जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा विसापूर, संगमेश्‍वर – जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा, कनकाडी, गोताडवाडी, रत्नागिरी – जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा शिरगाव मराठी, लांजा – जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा भडे क्र.१, राजापूर – जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा कळसवली क्र.१ यांचा समावेश आहे.

तीन शाळांना विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला त्यामध्ये जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा कवी केशवसुत माध्यमिक विद्यालय मालगुंड, जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा साखरपा, गोवरेवाडी, जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा आंबयेपाटील खेड या शाळांचा समावेश आहे