गोविंदा रे गोपाळा… रत्नागिरीत रंगला गोविंदाचा थरार

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

गोविंदा रे गोपाळाच्या तालावर थिरकत सोमवारी रत्नागिरीत दहीकाला उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. रत्नागिरी शहरातील विठ्ठल मंदिरात दहीकाला उत्सवानंतर बाजारपेठेतील पारंपारिक दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथके बाहेर पडली.

रत्नागिरी जिल्ह्यात 234 सार्वजनिक आणि 3040 खासगी दहीहंडीचा थरार रंगला. सोमवारी सायंकाळी विठ्ठल मंदिरातून रथयात्रा काढण्यात आली.बालगोपाळाच्या वेशभूषेत लहान मुले सहभागी झाली होती.