नवविवाहितेचा समुद्रात आत्महत्येचा प्रयत्न, सतर्क पोलिसाने वाचवले प्राण

100

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरीतल्या भाट्ये समुद्रात बुडत असलेल्या एका महिलेला पोलीस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे जिवदान मिळाले.  राजाभाऊ चाटे असे या साहसी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. कौटुंबिक कारणातून सासूसोबत वाद झाल्यामुळे या महिलेने समुद्रात उडीमारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

पाली येथील एका महिलेने सोमवारी भाटे पुल येथे समुद्रात उडीमारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भाटे चेक पोस्टवर ड्युटीवर असणारे पोलीस क्रमचारी राजाभाऊ चाटे यांनी तत्काळ पाण्यात उडी मारून बुडणाऱ्या महिलेला वाचवले. तिला बेशुद्ध अवस्थेत पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करून तिचे प्राण वाचवले. राजाभाऊ चाटे यांच्या साहसी कामगिरीबाबत त्यांच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांच्यासह नागरिकांकडून  कौतुकाचा वर्षाव होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या