रत्नागिरी रेल्वे स्थानकात तीन चोरट्यांना अटक

1

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरीत रेल्वे स्थानकावर तीन चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ९ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. हे तिघेही रेल्वेप्रवासात चोरी करत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. अलीमुस्तफा अब्दुल सत्तार बेन्नी (29) निसार धोंडीबा बागवान (38) टोनी ब्राोरो उर्फे नेपाळी (24) अशी त्यांची नावे आहेत.

रत्नागिरी जिल्हयामध्ये रेल्वेप्रवासात चोऱ्यांच्या घटना वाढत आहेत. यामुळे रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांचे एक पथक नियुक्त करण्यात आले. हे पथक रत्नागिरीत रेल्वे स्थानकावर गस्त घालत असताना त्यांना हे तीन संशयित आढळले होते. त्यांची विचारपूस केली असता त्यांना कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. ते तिघेही परप्रांतिय असल्याचे त्यांच्या बोलण्यावरुन कळाले. त्यांच्याजवळ ९ मोबाईल सापडले असून बाजारात त्यांची किंमत ५७,६०० हजार रुपये एवढी आहे.