रावणाचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी, जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी

सामना ऑनलाईन, कानपूर

कानपुरातील रावणाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी  जबरदस्त गर्दी झाली होती. हे मंदिर बरंच जुनं असून ते फक्त दसऱ्याच्या दिवशी उघडलं जातं. रावणाचा जन्म हा दसऱ्याच्याच दिवशी झाला होता. योगायोग असा की त्याच दिवशी प्रभू श्रीरामाने रावणाचा वधही केला. उत्तर प्रदेशात भगवान शंकराचं हे एकमात्र मंदिर असं आहे ज्यामध्ये रावणाचेही मंदिर आहे. दसऱ्याच्या दिवशी या मंदिराचं कवाडं भक्तांसाठी उघडली जातात आणि रावणाचे दर्शन घेण्यासाठी गर्दीही प्रचंड होतं.

कानपुरातील शिवायल परिसरामध्ये सकाळी रावणाचा वाढदिवस साजरा केला जातो आणि संध्याकाळी किंवा रात्री रावणदहन केलं जातं. रावण हा भगवान शंकराचा निस्सीम भक्त होता. यामुळे इथल्या भगवान शंकराच्या मंदिरात त्यालाही स्थान देण्यात आल्याचं इथल्या मंडळींचं म्हणणं आहे. रावण मंदिराचे संयोजक के.के.तिवारी यांनी सांगितलं की 1868 साली दहा तोंडं असलेली रावणाच्या मुर्ती मंदिरात बसवण्यात आली.

रावणाचं हे मंदिर वर्षातून फक्त एकच दिवस म्हणजे दसऱ्याला उघडलं जातं. सकाळी रावणाचा जन्म साजरा करण्यासाठी कवाडं उघडली जातात आणि दहनाच्या आधी ही कवाडं पुन्हा बंद केली जातात. रावणासमोर शिराळ्याच्या वेलीवर येणारी फुलं अर्पण केली जातात आणि राईच्या तेलाचा दिवा लावला जातो.