ऐरोलीत रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा, 62 तरुण-तरुणींना अटक

1

सामना प्रतिनिधी, नवी मुंबई

ऐरोली सेक्टर-9 मधील चायना गार्डनजवळ सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा छापा टाकला. यामध्ये 62 जणांना ताब्यात घेण्यात आले. या पार्टीचे आयोजन करण पाटील व मयूर मढवी यांनी केले होते. तरुणासाठी 500 रुपये इण्ट्री फी तर तरुणीसाठी मोफत प्रवेश ठेवण्यात आला होता.

ऐरोली सेक्टर 9 मध्ये बेकायदेशीरपणे सुरू असणाऱ्या चायना गार्डन या चायनीज कॉर्नरच्या मागील बाजूने दोन आठवडय़ांपूर्वी एका भाजप राजकीय नेत्याचा वाढदिवस मोठय़ा थाटात साजरा करण्यात आला होता. त्यांनतर याचठिकाणी करण पाटील व मयूर मढवी यांनी रेव्ह पार्टी ठेवली होती. शनिवारी रात्री या ठिकाणी डिजे दणदणाटासह पार्टी सुरू होती. याचवेळी गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अजय कुंभार यांना माहिती मिळताच पोलिसांनी पार्टीवर छापा टाकून 62 तरुण-तरुणींना ताब्यात घेतले. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, डोंबिवलीतून पार्टीसाठी ओले होते. या पार्टीसाठी ही मुले आली होती. आयोजकांना 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ड्रग्ज मात्र सापडले नाही
पार्टीत ड्रग्स आढळून आले नाही. मात्र विदेशी दारूसह हुक्कांचे साहित्य आढळून आले आहे. ते जप्त करण्यात आले असून आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पार्टीमध्ये सामील झालेल्यांना वैद्यकीय तपासणी करून सोडण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे यांनी दिली.